प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथे कारी गुलाम मुस्तफा उर्फ बडे हजरत र अलेह यांचे १२ वे ऊर्स निमित्त "संदल शरीफ" शहराच्या प्रमुख मार्गाने निघाला. याच निमित्ताने मोठा आखाडा (रविवार पेठ) येथे नागरिकांसाठी मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता. यात जळगाव, धुळे, नाशिक तसेच बऱ्हाणपूर या जिल्ह्यातून जवळपास २००० हजार नागरिकांनी लाभ घेतला.
या कॅम्पमध्ये रुपये ४०,००० ची औषधी सुद्धा मोफत वाटली गेली. मेडिकल कॅम्पमध्ये डॉ. एच. एम. शेख, नासिर खान, वसीम खान, अन्सर खान, सद्दाम सय्यद, लियाकत शेख, शेख दानिश (राजा), ड्रायकोडर्माचे शहबाज खान यांचे सहकार्य लाभले तर मेडिकलमध्ये प्रधानमंत्री जनरिक मेडिकलचे शेख अभिरुद्दिन (गुड्डू), गोसिया मेडिकलचे शेख आसिफ यांनी मोफत औषधी वाटप केली. तर मायक्रो कॉम्प्युटराईज्ड क्लिनिक लॅबोरेटरी चे इजाज अहमद खान शेख सैफुद्दीन यांनी जवळपास ३०० नागरिकांच्या रक्ताच्या तपासणी केल्या.
إرسال تعليق