Khandesh Darpan 24x7

“काँग्रेसचे मनी हाईस्ट…”, पंतप्रधान मोदींची खोचक टीका; म्हणाले, “७० वर्षांच्या हाईस्टचे…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडून प्राप्तीकर विभागाने ३५१ कोटींची बेहिशोबी रोकड जप्त केली. त्यावरून ‘मनी हाईस्ट’ अशी पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामधील कारवाईवरून मनी हाईस्टचे उदाहरण देत काँग्रेसवर टीका केली.


खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


ओडिशामधील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५१ कोटींची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली. तसेच जवळपास तीन किलोंचे सोन्याचे दागिने प्राप्तीकर विभागाने हस्तगत केले आहेत. या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 


सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,


भाजपाने आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ शेअर करत असताना पंतप्रधान मोदी या कारवाईचा संबंध ‘मनी हाईस्ट’ या नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरीजशी लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मनी हाईस्ट’ या काल्पनिक कथानकाची भारतात गरज आहे का? काँग्रेस सारखा पक्ष देशात असताना त्यांनी मागच्या ७० वर्षांपासून ‘हाईस्ट’ केलेली आहे, ज्याची मोजदाद अजूनही सुरू आहे.”

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील कार्यालयांवर आणि रांची येथील निवासस्थानी ६ डिसेंबर रोजी प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली होती. पाच दिवस साहू यांच्याकडील बेहिशोबी रोकडीची मोजणी सुरू होती. ७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा या विषयावर सोशल मीडियावर पोस्ट टाकून नोटांच्या थप्पीवरून काँग्रेसवर निशाणा साधला होता.

काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईचा एक मिनिटांचा व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे. या व्हिडिओत कपाटातून नोटांच्या थप्प्या हस्तगत केल्याचे दिसत आहे. तसेच यावेळी धीरज साहू यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमवेतचे फोटो दिसत आहेत. तसेच व्हिडिओच्या शेवटी साहू यांच्याकडे किती रोकड जप्त झाली, याची बातमीही दिसत आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांचा चेहरा असलेले एक मीमही दिसते. जे मनी हाईस्ट या सीरीजीमधील आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीही एक्स या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट टाकून काँग्रेसवर निशाणा साधला होता. “देशातील नागरिकांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावे आणि नंतर त्यांच्या (काँग्रेसच्या) इमानदार नेत्यांची भाषणे ऐकावित, जनतेकडून लुटलेल्या पै-पैचा हिशेब द्यावा लागेल. ही मोदीची गॅरंटी आहे”, अशी पोस्ट टाकून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

प्राप्तीकर विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

प्राप्तीकर विभागाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. एकाच छाप्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्याची पहिलीच कारवाई असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पाच दिवस १०० हून अधिक अधिकारी, पैसे मोजण्यासाठी ४० मोठ्या मशीन्स आणि जवळच्या एसबीआय बँक शाखेतून छोट्या मशीन्स आणाव्या लागल्या होत्या.


ओडिशा जिल्ह्यातील बोध डिस्टलरी प्रा. लि. या कंपनीच्या झारखंड आणि पश्चिम बंगाल येथे असलेल्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले होते. ही कंपनी काँग्रेस खासदार धीरज साहू यांची असून त्यांचे सुपुत्र रितेश साहू हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. धीरज साहू यांचे मोठे बंधू उदयशंकर प्रसाद हे कंपनीचे अध्यक्ष आहेत. शनिवारी धीरज साहू यांचे निकटवर्तीय असलेल्या राज किशोर जैस्वाल यांच्या निवासस्थानीही धाड टाकण्यात आली.


खासदार धीरज साहू कोण आहेत?

राज्यसभेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार धीरज प्रसाद साहू यांचा जन्म रांची येथे २३ नोव्हेंबर १९५५ रोजी झाला. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा राज्यसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. २००९ साली ते पहिल्यांदा खासदार झाले. तर २०१८ साली तिसऱ्यांदा त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. साहू यांचे वडील साहेब बलदेव साहू हे बिहार राज्यातील छोटा नागपूर जिल्ह्यात राहणारे होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून साहू यांचे कुटुंब काँग्रेसशी जोडलेले आहेत.

Loksatta December 12, 2023 14:23 IST

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم