Khandesh Darpan 24x7

वंचित बहुजन महिला आघाडी ची निंभोरा पोलीसात धडक: खिर्डीसह परिसरातील खुलेआम सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी


खिर्डी प्रतिनिधी


खिर्डीसह परिसरातील खुलेआम सुरु असलेले अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर करत असून पोलिसांचा वरदहस्त असल्याने कोणतीही कारवाई न करता चिरीमिरी होत असल्याने पोलिसांचा धाक संपला आहे. मात्र याकडे वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वंदना ताई सोनवणे व सायरा संजय कोचुरे महीला आघाडी रावेर तालुका अध्यक्ष पदाधिकारी यांनी निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे  मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते बंद करण्यात यावे, परिसरात खुले आम सट्टा पत्ता आणि इतर अवैध धंद्यामुळे गरीब कुटुंबांचे हाल होत असतात ते सकाळपासून संध्याकाळ पर्यंत २००, ३०० रुपये मजुरी कमवून येतात आणि पुरुषवर्ग देशी कॉटर, हातभट्टी, सट्टा व पत्ता यामध्ये खर्च करून टाकतात. 



त्यामुळे होते काय कि गरीब कुटुंबांच्या घरामध्ये मुला बाळांवर आणि पत्नीवर उपासमारीची पाळी येते, त्यांची संध्याकाळची चूल पेटत नाही. तसेच ऐनपूर, खिर्डी सट्टा पिढी निंबोल, खिर्डी, निंभोरा, तांदलवाडी,नदीच्या` विवरा येथील पत्त्याचे कल्ब व मांगलवाडी पासुन तर सांगवे पर्यंत ढाब्यांवर देशी विदेशी अवैध दारू बंद करून तसेच खिर्डीत मंदीर व बस स्टेण्ड च्या आवारात गावठी व देशी सरास विक्री केली जाते.शाळांच्या ५० मीटर च्या आत गुटखा विक्री केला जाते तरी महाशयानी ह्या सर्व अवैध धंद्याचा बंदोबस्त करावा असे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने महाशय पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.



अवैध धंदे बंद न झाल्यास वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व शासन जबाबदार राहतील अशी मागणी केली.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



यावेळी जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, तालुकाध्यक्ष सायरा कोचूरे, तालुक्यातील पदाधिकारी ललिता रमेश कोचुरे, आशा योगेश जाधव, पल्लवी  कोळी, शोभा बिऱ्हाडे, उषाबाई रघुनाथ वाघ, गुफाबाई वाघ, कविता कोचुरे, कमल कोचुरे, सुमन कोचुरे, रेणूकाबाई भील, रेशमा तायडे, प्रमिला कोचुरे, सुरेखा  आदिवाल, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, शे.याकूब शे.नासीर, बाळू शिरतुरे, सलिमशाह, कांतीलाल गाढे, ज्ञानेश्र्वर तायडे,  संजय कोचुरे, पंकज तायडे, मनोहर तायडे, कुंदनसिंग बारेला यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم