निंभोरा प्रतिनिधी
निंभोरा येथील कृषी तंत्र विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी तंत्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हादभाऊ बोंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे हे उपस्थित होते.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रल्हाद बोंडे, राजीव बोरसे यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले व विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचे स्मरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रथम वर्षातील विद्यार्थी मोहित पाटील, नितेश पोहेकर, व कु. नंदिनी बडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विवेक बोंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. एस. महाजन सर यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी धनराज बाविस्कर, जितेंद्र कोळंबे, कु. आम्रपाली जाधव व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
फ्री जाहिरात
फ्री जाहिरात
إرسال تعليق