Khandesh Darpan 24x7

मैत्रीचा आनंदी सोहळा तथा गुरुजन कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न


प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


आज मकर संक्रांतीच औचित्य साधत "तिळगुळ घ्या... अन् गोडगोड बोला...." या उक्तीनुसार तब्बल २५ वर्षांनी सन १९९७-९८ या वर्षात दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी स्नेहसंमेलन व गुरुजन कृतज्ञता सोहळा एन. जी. पाटील माध्यमिक विद्यालय उधळी येथील शाळेच्या प्रांगणात पार पडला.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



आजच्या धकाधकीच्या जीवनात दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणाव्या मध्ये गारव्या सारखा ह्या काव्य ओळी खरचं मैत्रीच्या नात्यात ओढ आणि प्रेम, आपुलकी वृद्धिंगत करण्यात फलदायी ठरतात.


आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनाजी नाना विद्यालय- खिरोदा येथील माजी प्राचार्य आदरणीय तुकाराम बोरोले सर विराजमान होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक आदरणीय वाय. एल.पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य वक्तया म्हणून आदरणीय मेनका चौधरी मॅडम व विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय के. आर. महाजन सर उपस्थित होते. प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन , दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच  दिवंगत गुरुजन वर्ग कर्मचारी व स्नेही जणांना श्रद्धांजली देवून करण्यात आली.



शालेय जीवनात शिस्तीची व अध्यापनाचे धडे देवून विद्यार्थ्यांच्या जीवनाची जडण घडण केली अनेक पिढ्यातील विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा उजेड निर्माण केला त्या महनीय गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊन शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देवून यथोचित सर्व आदरणीय गुरुजन वर्ग  यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. त्यांनतर माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या पाल्यांनी शैक्षणिक उंची गाठत यशवंत झालेल्या पाल्य व पालकांचा गौरव व अभिनंदनीय शुभेच्छा विचारमंचवर विराजमान मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला.


पुस्तकाची पायरी करत अध्यापनाच्या शैलीने विद्यार्थी-विद्यार्थिनी मनानात विराजमान झालेले गुरुजन यांच्या शब्दांनी प्रत्येकाला ऊर्जा बळ मिळते म्हणून पुन्श्य ऊर्जावान शब्दांनी गुरुवर्य आदरणीय रावते सर व इंग्रजीचे उत्कृष्ट शिक्षक आदरणीय खवले सर यांनी मनोगत व्यक्त केले.


ज्यांच्या मातृ हृदयी अखंड प्रेमाने शब्दांनी अनेक पिढ्यातील विद्यार्थ्यांना यशाची शिखरे गाठण्यात प्रेरणा देणाऱ्या प्रगतीचे पंख दिले अश्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आई साहेब मेनका बाई चौधरी मॅडम यांनी आपल्या भाषणात आपल्या प्रेमळ शब्दांनी मायेची, कौतुकाची ऊब दिली तसेच ज्यांच्या गणिताने जीवनाच गणित अधिक पक्क करून आपल्या शैली दार भाषणातून अनमोल मार्गदर्शन आदरणीय के. आर. महाजन सर यांनी केले. 


आदरणीय प्रमुख अतिथी विद्यमान मुख्य अध्यापक आदरणीय वाय. एल. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील प्रसंग, विद्यार्थ्यांच्या जीवनातील जडण घडण या बद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य टी. जी. बोरोल सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाळेचे गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी हेच विद्यालयाचे मानबिंदू असतात यशाची शिखरे गाठत जीवन आनंदाने फुलवा असा मौलिक सल्ला देत प्रबोधित केले. "पुस्तक मस्तक घडवते, मस्तकात विचार येतात, विचाराने क्रांती घडते आणि क्रांतीने समाज परिवर्तन होते हाच धागा पकडत कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय टी. जी. बोरोले सर यांनी  आपल्या तर्फे साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना परिचय देत असताना आपल्या शुभ हस्ते प्रदान केले.


आमचे मित्र बाळू जवरे सर व दिनेश भाऊ कोळी यांनी आपल्या विद्यार्थी मनोगतातून गुरुजनप्रती व विद्यालयाप्रती ऋण व्यक्त करत शालेय जीवनातील प्रसंगाना भावनेला वाट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.


विचारांची उंची गाठलेल्या या दिमाखदार सोहळ्याचे बहारदार शैलीदार व आपल्या अलौकिक आवाजाच्या माधुर्य ने भावनिक शब्दांनी प्रत्येकाच्या हृदयाला हात घालत उत्कृष्ट सूत्र संचालन आदरणीय मनीषा ताई पाटील यांनी केले. कार्यक्रमचे प्रास्ताविक व  आभार प्रदर्शन श्री. विनोद बा-हे सर यांनी केले. 


कार्यक्रम यशस्वितेसाठी समिती प्रमुख  दिनेश भाऊ कोळी, डी. एम. पाटील, नितीन पाटील, रुपेश चव्हाण, प्रवीण नेमाडे, विनोद बा-हे, मनीषा पाटील, भावना पाटील, विजया पाटील, बाळू जवरें, धर्मेंद्र पाटील, सर्व  मित्र मैत्रिणी यांनी सहकार्य केले.


       शब्दांकन..


 
श्री. विनोद बा-हे सर...

(प्रकाश विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मोठे वाघोदे)


फ्री जाहिरात 


फ्री जाहिरात 


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم