भारतीय जनता पक्षात संघटनात्मक नियुक्ती नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत. त्यातील सावदा शहर अध्यक्ष पदासाठी विद्यमान शहराध्यक्ष जे. के. भारंबे यांची पुनश्च निवड करण्यात आली. तर रावेर तालुका उद्योग आघाडी अध्यक्षपदी रितेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे नियुक्तीपत्र जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
प्रखर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या जे. के. भारंबेंना आपल्या पक्षनिष्ठतेची पावती म्हणून यापूर्वीच शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यासोबत शहरातील बहुतांश नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करते झाले. मात्र भाजपाशी एकनिष्ठ असलेले जे. के. भारंबे व त्यांच्या नगरसेविका असलेल्या पत्नी रंजना भारंबे हे मात्र भाजपातच राहिले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सावदा शहरातील पक्षाचे संघटन मजबूत करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भारंबेंना पुढील निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी देत पुनश्च एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शहरातील युवा उद्योजक रितेश पाटील यांचा दांडगा जनसंपर्क व उद्योग विश्वात त्यांनी निर्माण केलेली स्वतःची ओळख या बाबी लक्षात घेता पक्षाने त्यांची भाजपा उद्योग आघाडीच्या रावेर तालुका अध्यक्षपदी निवड केली.
या निवडीबद्दल दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षाताई खडसे, रावेर तालुका अध्यक्ष महेश चौधरी यांनी अभिनंदन केले असून या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
إرسال تعليق