Khandesh Darpan 24x7

सावदा येथे एकाच रात्रीत तीन शसत्र घरफोडी








प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


दि. 22 रोजी अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे सुशोभीकरणात सर्व रामभक्त असताना येथील स्वामीनारायण नगर मध्ये मध्यरात्री दरोडेखोरांनी संधीचा फायदा घेत कोळंबे गुरुजी हल्ली मुक्काम पुणे यांच्या घराचे कुलूप कापून सुमारे 18 हजार रुपये ऐवज तसेच चांदीचे शिक्के लंपास केले.


जाहिरात


दरोडेखोर इथेच न थांबता त्याच्या शेजारील भागवत मधुकर कासार यांच्या घराची मागची खिडकीची ग्रील तोडून मधील गोदरेजचे कपाटाचे लॉकर फोडून त्यातील सहा तोळे बांगड्या चार तोळे मंगल पोत पाच ग्रॅम अंगठी व दहा ग्रॅम कानातील झुमके असा साधारण 10 ते 11 तोळे सोने लंपास केले.


व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा. 



जाहिरात

सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



त्यानंतर जवळच विकी भिडे यांचे केळा ग्रुप मधून सुद्धा 50 ते 55 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समजले हे वृत्त कळताच सावदा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. जालिंदर पळे यांनी घटनास्थळी भेट दिली व तत्काल जळगाव येथून फिंगर प्रिंट एक्सपर्ट व श्वान पथक पाचारण करण्यात आले, त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. 


सावदा येथील कर्तव्यदक्ष अधिकारी जालिंदर फळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कुरकुरे, प्रकाश जोशी, संजय देवरे, देवा पाटील, यशवंत टहाकळे, उमेश पाटील हे पुढील तपास करत आहे.



जाहिरात 


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم