Khandesh Darpan 24x7

Ram Mandir : राम मंदिराची ही एक विशेषता कोणालाच माहित नाही

अयोध्येतील राम मंदिर बनून जवळपास तयार झाले आहे. मंदिरांच्या प्रांगणात आणखी काही गोष्टी प्रस्तावित आहेत. त्या देखील भविष्यात तयार होणार आहे. पण सध्या बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या अनेक विशेष गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहित नाही. राम मंदिराच्या या खास गोष्टी कोणत्या आहेत जाणून घ्या.



 खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामाचा अभिषेक होणार आहे. देशभरातील लोकांमध्ये या निमित्ताने उत्सवाचे वातावरण आहे. कारण शेकडो वर्षानंतर राम मंदिर अयोध्येत होत आहे. राम मंदिराची भव्यता पाहण्यासारखी आहे. राम मंदिर बनवण्यासाठी विशेष कलाकारांची मदत घेतली गेली आहे. राम मंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याआधी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराची महत्त्वाची माहिती सांगितली आहे.



राम मंदिराची वैशिष्ट्ये

राम मंदिराचे बांधकाम हे जुन्या शहराच्या शैलीत करण्यात आले आहे. मंदिराची पूर्व – पश्चिम लांबी ही 380 फूट आहे. तर रुंदी 250 फूट आहे. राम मंदिराची उंची 161 फूट आहे. हे संपूर्ण मंदिर तीन मजल्यांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक मजला 20 फूट आहे.

जाहिरात 


भव्य मंदिराचे बांधकाम

राम मंदिरात 392 खांब आहेत. तसेच एकूण 44 दरवाजे आहेत. यावरून तुम्ही मंदिराच्या भव्यतेचा अंदाज लावू शकता. मंदिराच्या पहिल्या मजल्याला राम दरबार बनवण्यात आले आहे.


राम मंदिरात पाच मंडप

अयोध्येतील हा राम मंदिरात एकूण पाच मंडप आहेत. ज्यांना नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप अशी नावे दिली गेली आहेत. राम मंदिराच्या खांबांवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सिंह द्वारातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे.


मंदिराची विशेषता काय?

राम मंदिराच्या बांधकामात कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. यामध्ये चारही बाजुंना चार मंदिरे आहेत. मंदिर परिसरात सूर्यदेवाचे मंदिर, देवी भगवतीचे मंदिर, भगवान गणेशाचे मंदिर आणि भगवान शिवाचे मंदिर बनवण्यात आले आहे. मंदिराजवळ प्राचीन सीता विहीर देखील आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे मंदिराच्या बांधकामात कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही.

जाहिरात 

सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



राम मंदिरात ही मंदिरे प्रस्तावित

राम मंदिरात आणखी काही मंदिरे प्रस्तावित आहे. ज्यामध्ये महर्षी वाल्मिकी याचे मंदिर, महर्षि वशिष्ठ यांचे मंदिर, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषाद राज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरे देखील बांधली जाणार आहेत. या शिवाय कुबेर टिळ्यावर जटायूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच प्राचीन शिवमंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.



राम मंदिरात आणखी काय सुविधा

मंदिराचे आर्द्रतेपासून संरक्षण करण्यासाठी 21 फूट उंच प्लिंथ तयार करण्यात आला आहे. यासाठी ग्रॅनाइटचा वापर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे राम मंदिरात प्राचीन सभ्यता तर जपलीच गेली आहे पण त्याबरोबर आधुनिक सुविधाही देण्यात आल्या आहेत. राम मंदिरात सीवर ट्रीटमेंट प्लांट देखील उभारण्यात आला आहे. याशिवाय वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.


राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी २५ हजार क्षमतेचे अभ्यागत सुविधा केंद्र बांधण्यात आले आहे. याशिवाय मंदिरात स्नानगृह, शौचालय, वॉश बेसिन यांची देखील सुविधा देण्यात आली आहे.ETV9 Marathi -Updated on: Jan 18, 2024 | 9:21 PM
जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم