Khandesh Darpan 24x7

डी. एस. देशमुख हायस्कूल थोरगव्हाण 1992 व 1994 च्या इयत्ता १० वीच्या बॅच चे स्नेह संमेलन उत्साहात




प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


डी. एस. देशमुख हायस्कूल थोरगव्हाण ता.रावेर जि.जळगाव येथील सन १९९२ व १९९४ च्या इयत्ता १० वीच्या बॅच चे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. अविंस्मरणीय अश्या जुन्या आठवणी या वेळी ताज्या करण्यात आल्या.



तब्बल तीस-बत्तीस वर्षानंतर दोघं बॅच च्या विद्यार्थ्यांना शिक्षकवृंद भेटल्याने भारावून गेले. जीवनाच्या जडणघडनात मोलाचे मार्गदर्शन रुपी आशीर्वाद ज्या शिक्षकांनी दिला त्यांना भेटल्यानंतर परम सुखाचा आनंद अनुभवास आला.



जाहिरात 

सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



ह्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वैष्णव सर यांनी आपल्या १०५ वर्ष जुन्याशाळेसमोरील सद्य स्थितीत भेडसावत असलेल्या समस्या मांडल्या. त्यातील प्रमुख छता विषयाची (कौल बदलवण्यासाठी) मदतीसाठी हाक दिली ती समजून घेऊन त्याला प्रतिसाद देत आणि आपले शाळेसाठी काही तरी देणे आहे ह्या भावनेतूनच सन १९९२ च्या बॅच ने रू. ११,१११/- (एकरा हजार एकशे एक) तसेच अभिमानाची बाब म्हणजे १९९२ बॅच चे सदैव टॉपर असणारें किशोर अशोक पाटील मु.गाव थोरगव्हाण, हल्ली मु. कल्याण  (शाळेचे  सेवानिवृत्त लिपिक ए. पी. पाटील यांचे धाकटे चिरंजीव) यांनी तात्काळ वैयक्तीत रू. १,००,०००/- (एक लाख) तसेच १९९४  बॅच चे विकास तुकाराम पाटील मु.गाव थोर. हल्ली मु. अमेरीका यांनी रू. २,००,०००/- (दोन लाख), तसेच सन १९९२ च्या बॅच ने इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्ध्यास प्रत्येकी रू. ५,००० रुपयांच्या ठेवी वरील व्याज व सन २०२४-२५ या शिक्षणिक वर्षात शिकत असलेल्या २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे जाहीर केले.



यावेळी अशाच प्रकारे सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलन आयोजीत करून एकमेकांच्या सुख दु:खात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहभागी होऊन सहकार्याच्या भावनेतून शाळेच्या तसेच गावाच्या प्रगतीस हातभार लावून आपल्या शाळेची त्याचबरोबर गावाची ख्याती देशताच नाहीतर जगभरात उज्वल करण्यास कटिबद्ध होऊ अशी इच्छा व्यक्त करण्यात आली.


जाहिरात 


जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


 

Post a Comment

أحدث أقدم