प्रतिनिधी : राज चौधरी | प्रदीप कुळकर्णी
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह इतर अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री सुरू झाली आहे. त्यातच काही छोटे गुटखा विक्रेते आता घाऊक विक्रेते झाले आहेत. आणि रावेर तहसीलच्या जवळपासच्या गावांमध्ये जाऊन घरपोच उपलब्ध करून देण्याचे काम जोरात सुरू आहे.
राज्य शासनाने गुटखा बंदीची घोषणा केली असली तरी रावेर तहसीलसह अन्य गावांमध्ये अवैध गुटखा विक्रीचा धंदा आरामात सुरू आहे. कोणाच्या आशीर्वादाने हा धंदा सुरू आहे. यावर एफडीए प्रशासनाकडून कडक कारवाई का केली जात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Global India TV 04/02/2024
Post a Comment