Khandesh Darpan 24x7

धनाजी नाना महाविद्यालय येथे आत्मनिर्भर युवती अभियान



प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने युवतींसाठी दिनांक 12 फेब्रुवारी, 2024 ते 17 फेब्रुवारी, 2024 या काळात आत्मनिर्भर युवती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 





कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी अनिल हेडाऊ एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स, भुसावल यांनी राष्ट्रीयकृत बँकेत "महिलांसाठी विविध योजना" या विषयावर माहिती दिली. 


त्याचप्रमाणे  आज तिसऱ्या दिवशी डॉ. संजीवकुमार सावळे यांनी महिला स्वयंरोजगार आणि विविध योजना या विषयावर मार्गदर्शन केले प्रसंगी वक्त्यांचे स्वागत डॉ. विजय सोनजे विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले.


सूत्रसंचालन कुमारी दिव्या वानखेडे, छाया शिरसाळे व आभार माधुरी भरणे, रोहिणी माळी या विद्यार्थिनींने मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सरला तडवी, डॉ. सीमा बारी, डॉ. पल्लवी भंगाळे, प्रा. नाहीदा कुरेशी, प्रा. शुभांगी पाटील, प्रा. अदिती राके, प्रा. कामिनी पाटील, डॉ.राजेंद्र ठाकरे यांचे सहकार्य लाभले.


जाहिरात 

जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم