Khandesh Darpan 24x7

मुफ्ती सलमान अझहरी वरील कारवाईच्या निषेधार्थ सावदा येथील मुस्लिम बांधवांनी दिले निवेदन



प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


नुकतेच मुफ्ती सलमान अझहरी यांचे संपूर्ण (तकरीर) भाषणाचा संदर्भ न घेता, त्यांचे भाषणाचा अल्प भाग उचलून जातिय तेढ निर्माण करणेकामी प्रसारित करून विशेष त्यांना लक्ष करण्यात आल्याचे चुकीचे मनमानी कार्य दिसून येते. 


मुफ्ती साहेब यांनी असे कोणतेही प्रक्षोभक भाषण दिले नाही किंवा कोणत्याही धार्मिक समुदायाविरुध्द काही बोलले नाहीत. तरी देखील गुजरात येथील संबंधित यंत्रणा कडून त्यांचा अटकाव करण्यात आला. अशा मुस्लिम धर्मगुरू विरुद्ध केलेली सदरील कारवाई पक्षपाती वृत्तीची दिसून येते. म्हणून मुफ्ती सलमान अझहरी यांच्या वरील कारवाईच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम बांधवांनी आज दि. १० फेब्रुवारी रोजी सावदा पोलिस ठाण्यात सहा. पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांना निवेदन सादर करून निषेध नोंदवला. 


यावेळी हाजी कादिर, सोहेल खान, शेख कलिम जनाब, अय्युब खान सर, कारी युनूस सैय्यद, शेख इरफान, युसूफ शाह, फरीद शेख, गुलाम रसूल कुरैशी, शेख निसार, शेख कमरोद्दीन, अली हैदर सर, शेख समद इत्यादी उपस्थित होते.


जाहिरात 


जाहिरात 



जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم