Khandesh Darpan 24x7

मनसेची 2.5 टक्के मते : ‘ठाकरे ब्रँड’ शिवाय राज्यात यश कठीण वाटू लागल्यानेच राज ना महायुतीत आणण्याची भाजपची धडपड

शरद पवारांचे अनुकरण : भाजपनेही वाढवली चुलत भावांतील जुगलबंदी


खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


उद्धव ठाकरेंशी युती तुटल्याने ‘ठाकरे ब्रँड’ नावाशिवाय महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ प्लस जागा जिंकणे फार कठीण आहे, याचा अंदाज भाजपला महिनाभरापूर्वी आला. म्हणून मनसेच्या २.५ टक्के मतांवर डोळा ठेवून राज ठाकरेंना महायुतीत आणण्यासाठी धडपड करण्यात आली. दुसरीकडे आपल्याकडे वक्तृत्वाची ताकद असली तरी संघटनेची मजबूत बांधणी असलेले मित्रपक्ष सोबत हवेत, हे राज यांना लक्षात आले. म्हणून त्यांनीही मैत्रीचा हात पुढे केला.


२०१९ मध्ये राज यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी शिवसेना-भाजपविरुद्ध प्रचार केला. पण त्याचा निकालावर परिणाम झाला नाही. मात्र, आता हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंवर ते थेट हल्लाबोल करू शकतात. त्याचा मराठी मतांवर परिणामही होऊ शकतो, असा कयास बांधून भाजपने हालचाली केल्याचे दिसत आहे.


जाहिरात



राज यांनी २०१९ च्या लोकसभेला उमेदवार उभे केले नाहीत. २०१९ च्या विधानसभेत मनसेला २.२५ टक्के म्हणजेच १२,४२,१३५ मते मिळाली. यापूर्वी मनसेला २०१४ च्या लोकसभेत १.५ आणि २००९ लोकसभेत ४.०७ टक्के मते मिळाली होती. त्यामुळेच, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना पराभूत करण्यासाठी राज ठाकरेंना महायुतीत सामील करून घ्यावे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाटले. त्यानुसारच महिनाभरात हालचाली झाल्या.


राज यांनाही विधानसभा, मनपात फायदा : भुजबळ

राज ठाकरे महायुतीसोबत आल्याने भाजपचा तोटा होईल, असाही सूर व्यक्त होत आहे. मतांची गणितेही मांडली जात आहेत. मात्र, राज सोबत आल्याने महायुतीला फायदाच होणार आहे, असा अंदाज मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, आगामी विधानसभा, मनपात राज यांचाही विशेष फायदा होणार आहे.​​​​​​​


सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



भाजप आणि मनसेची विचारधारा हिंदुत्वाची

राज ठाकरे उत्तर भारतविरोधी भूमिका घेत होते त्यामुळे भाजपने मनसेपासून आतापर्यंत अंतर ठेवले होते. पण, भाजप आणि मनसेची विचारधारा हिंदुत्वाची आहे. असा दावा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेसोबतची युती योग्य ठरवली आहे.​​​​​​​


मजबूत संघटनेचे महत्त्व कळले असावे

२०१९ च्या विधानसभेत मनसेच्या १०१ उमेदवारांपैकी कल्याण ग्रामीणमधून फक्त राजू पाटील विजयी झाले. ८६ जणांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीविषयी शंका उपस्थित केली जाऊ लागली. संघटनेची पाळेमुळे मजबूत झाली तरच निवडणुकीत त्याचा टिकाव लागतो, हे राज यांना कळले असावे.​​​​​​​ बाळासाहेबांंसारखेच वक्तृत्व असले तरी राज यांना मनसेची मजबूत बांधणी करता आली नाही. आता महायुतीतील शिंदेसेनेसोबत पक्षबांधणीला बळ मिळेल, असे राज यांचे गणित असावे.​​​​​​
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/mnss-25-percent-vote-bjps-struggle-to-bring-rajna-into-the-grand-alliance-is-only-because-success-in-the-state-seems-difficult-without-the-thackeray-brand-132749144.html?_branch_match_id=1276923822377862286&utm_campaign=132749144&utm_medium=sharing&_branch_referrer=H4sIAAAAAAAAA8soKSkottLXT8ksq0zUzdXLzNO3cPEs8fVJ9jDzSAIAWG3QVh4AAAA%3D

हे  ही  वाचा - खालील लिंक वर tap करा. 


या बातमीचे प्रायोजक आहे.   KEY INTERNER SERVICES

जाहिरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم