कोचुर प्रतिनिधी
आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. घराला घरपण हे देखील महिलांमुळेच मिळते आहे. जी आपली संस्कृती टिकली आहे ते सुद्धा महिलांमुळेच असे मत सावदा येथील ओम शांती केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारीय वैशाली दीदी यांनी व्यक्त केलं त्या कोचूर येथील "सन्मान नारीशक्तीचा" या कार्यक्रमात बोलत होत्या.
जाहिरात
कोचुर येथे बोरखेडा सिम येथील सभागृहात महिलांतर्फे नारीशक्तीचा सन्मान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग, सावदा येथील ओम शांती केंद्र संचालिका वैशाली दीदी, सावदा येथील मा. नगराध्यक्ष रेखा वानखेडे, सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सिमसन वानखेडे, सरपंच ज्योती कोळी, उपसरपंच रेशमा तायडे, मा. सरपंच स्वाती परदेशीं, पोलीस पाटील मनीषा पाटील, शिक्षिका संगीता गोसावी, ग्रापं ऑपरेटर कविता तायडे. यांच्यासह गावातील मोठ्या महिला उपस्थित होत्या.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
पुढे वैशाली दीदी म्हणाल्या की, साऱ्या महिला एक पावर आहोत एक शक्ती आहोत. या शक्तीशिवाय शिवही अपूर्ण आहे. त्यामुळे त्या शक्तीला न दाबता तिचा योग्य स्थळी आपण वापर केला पाहिजे. तर सिमरन वानखेडे म्हणाल्या साऱ्या महिलांनी एकमेकीला साथ देत आपली स्पर्धा पुरुषांची केली पाहिजे. आपण कुठल्या क्षेत्रात कमी नाही आणि आपण स्वतःला कमी देखील लेखायचं नाही.
जालिंदर पळे यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. या वेळी लहान मुलींनी जिजामाता, सावित्री माता, सिंधू ताई सपकाळ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, रमाबाई आंबेडकर यांची वेशभूषा साकारली होती या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा वर्कर, महिला शेतकरी तसेच महिला भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला.
जाहिरात
सूत्रसंचालन अनीता पाटील यांनी केले तर आभार मनीषा पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती चौधरी, रूपाली चौधरी, सविता तायडे यांनी परिश्रम घेतले.
या बातमीचे प्रायोजक आहे. GLAMOUR TOUCH Bridal Studio
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
إرسال تعليق