Khandesh Darpan 24x7

निंभोरा केंद्रावर वादळी वाऱ्यासह पाऊस : येथे 71 टक्के मतदान



निंभोरा प्रतिनिधी : परमानंद शेलोडे 
                               

रावेर तालुक्यातील येथील लोकसभेच्या निवडणुकीत निंभोरा येथे  ७१.६३ टक्के मतदान झाले आहे. यात मतदान संख्या ६८७२ पैकी ४९२३ झाले आहे. 


यात 

बूथ क्र. २०५ वर ९४३ पैकी ६३०, 

बूथ क्र. २०६ वर ९३२ पैकी ६४९, 

बूथ क्र. २०७ वर ७९१ पैेकी ५७५, 

बूथ क्र. २०८ वर ९४३ पैकी ६३४, 

बूथ क्र. २०९ वर १०४२ पैकी ७९४, 

बूथ क्र. २१० वर ११२२ पैेकी ८३७, 

बूथ क्र. २११ वर १०७० पैकी ८०४ मतदान झाले आहे. 


असे एकूण ६८७२ पैकी ४९२३ मतदान ७१.६३ टक्के झाले आहे. 



सकाळी 7 वाजेपासून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावायला सुरुवात केली.  सकाळी ८.४५ वा. दरम्यान विजेसह पाऊस झाल्याने मतदारांमध्ये मध्ये तारांबड उडाली. काही वेळाने पाऊस थांबल्याने गारवा निर्माण झाल्याने मतदारांनी मोठ्या संख्येने उत्साहाने मतदान केले.  


प्रशासना तर्फे प्रत्येक बूथ जवळ व्हील चेअर, तसेच लहान मुलांसाठी खळणे व आरोग्य विषयक काळजी केंद्र उभारण्यात आले होते. यात आरोग्य केंद्र कर्मचारी, आशा गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्कल मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सेक्टर ऑफिसर, व ग्रापपंचायत कर्मचारी तैनात होते. निंभोरा पोलिस ठाण्याचे सपोनी हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली चौख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक शांततेत पार पडली.



या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे


आणि  

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

أحدث أقدم