Khandesh Darpan 24x7

दसनूर येथे 78.45 टक्के तर सिंगनूर येथे 76.80 टक्के मतदान





दसनूर  प्रतिनिधी


येथून जवळच असलेल्या दसनूर येथे जि.प. मराठी मुलांची शाळमध्ये बूथ नं ५४ मध्ये १०६४ मतदारापैकी ८४९ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क व बूथ नं ५४ नंबर मध्ये ४७७ मतदारांपैकी ३६० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. असे दोन्ही बूथ मिळून ७८.४५ टक्के मतदान झाले. 


तसेच सिंगनूर जिल्हा परिषद शाळेमध्ये बूथ नं ५६ येथे ११७१ मतदारांपैकी ८९७ नागरिकांनी  मतदानाचा हक्क बजावला तसेच या ठिकाणी ७६.८० टक्के मतदान झाले. तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी व लहान मुलांना सांभाळण्याची गैरसोय होऊ नये म्हणून बाळ संगोपन केंद्र अंगणवाडी येथे सुरू करण्यात आले होते. यावेळी लहान मुलांना सांभाळ करण्यासाठी अंगणवाडी सेविका अनिता पाटील, शारदा मालखेडे, अंगणवाडी मदतनीस संगीता चांदवे,  वैशाली तायडे, आशा सेविका मिना कोळी यांनी लहान मुलांना सांभाळ करण्यासाठी सहकार्य केले.



तसेच शिक्षक सोनाली मॅडम, डॉ. नरेंद्र महाले, बंडू तायडे सर, वसंत नागपुरे सर, वैद्यनाथ सर, पोलीस पाटील अभय सोनवणे, पोलीस शिपाई चंद्रशेखर सुरंगे , होमगार्ड मिलिंद शिरसाठ बी एल ओ अमोल पाटील, हेमंत चांदवे ग्रामपंचायत, कर्मचारी सरपंच यांनी यावेळी सहकार्य केले .


येथून जवळच असलेल्या सिंगनूर येथील रहिवासी प्रा. संजय मोरे अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष भाजपा अनु. जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव यांनी आपल्या आई वडील समवेत सिंगनुर या आपल्या मुळगावी  वयोवृद्ध  अपंग आई, वडील मधुकर मोरे वय ८५ सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी आई शांताबाई मोरे वय ८० वर्ष नरेंद्र मोदी तिसऱ्यादा भारताचे पंतप्रधान व्हावे म्हणुन मोठ्या उत्साहाने मतदान केले.



या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم