प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
लहान वाघोदा येथे १ मे महाराष्ट्र दिन म्हणजेच कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथील झेंडावंदन गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. दिपाली चौधरी यांनी न फडकवता प्रथमच गावातील कामगार अशोक रोटे यांच्या हस्ते झेंडावंदन करून एक आदर्श निर्माण केला.
येथील सरपंच दिपाली चौधरी यांनी त्यांना असलेल्या झेंडावंदनचा मान स्वतः न घेता कामगार दिनाचे औचित्य साधून गावातील अशोक रोटे या कामगाराला मान देऊन त्यांच्या हस्ते झेंडावंदन करून एक उत्कृष्ट आदर्श समाजात व परिसरात निर्माण करण्याचे काम केले.
यावेळी उपसरपंच सत्तार पटेल, भाजपा रावेर तालुका चिटणीस तथा ग्रा .पं. सदस्य जितेंद्र चौधरी, संदिप कोलते, पिरन कुलकर्णी, फातमा तडवी, दमयंती शिंदे, वंदना कोलते, रुपाली कोलते, पुजा कोलते, ग्रामसेवक श्रीकांत पाटील, पोलीस पाटील राजेश कोलते, जि . प . शाळेचे मुख्याध्यापक सौ. फेगडे मॅडम, सरोदे गुरुजी, पाटील गुरुजी, आकाश कोळी, रविंद्र कोळी, वैभव चौधरी, कन्हैया आदिवाले, अंगणवाडी सेविका प्रतिभा शिंदे, रेखा बाऊस्कर, मदतनीस भारती झोपे, आशा वर्कर मनिषा कोळी व मनिषा सोनवणे उपस्थित होते.
या बातमीचे प्रायोजक आहे. KEY INTERNER SERVICES
https://divyamarathi.bhaskar.com/national/news/jee-mains-result-2024-jee-mains-result-cutoff-jee-main-result-latest-update-132926894.html?_branch_match_id=1276923822377862286&utm_campaign=132926894&utm_medium=sharing&_branch_referrer=H4sIAAAAAAAAA8soKSkottLXT8ksq0zUzdXLzNMPiHIp8%2FSvKDPxTAIAx9FKWR4AAAA%3D नवी दिल्ली13 तासांपूर्वी
إرسال تعليق