Khandesh Darpan 24x7

तब्बल ३० वर्षानंतर विद्यार्थी रमले शाळेत, जुन्या आठवणीना उजाळा.....





प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात. त्यात निवडणुकीची धामधून सुरू आहे त्यामुळे शाळा संपूर्ण ओस पडल्या आहेत. अशातच काही विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरी गेल्यावर आपल्या शाळेविषयी ओढ लागते. त्यात जर ते विद्यार्थी माजी असतील तर ती ओढ अधिकच घट्ट असते. आणि त्यातून मग ते आपल्या जुन्या शाळेकडे धाव घेतात आणि आठवणीत रमून जातात. असेच काहीसे घडले ते सावदा येथील श्री आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे



तब्बल ३० वर्षानंतर इयत्ता १२ वी ची कला शाखेचे बहुतांश विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जमले आणि सर्वांच्या उत्साहाला उधाण आले. प्रत्येक जण आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये त्या आठवणीत रमून गेले. जो तो आपला वर्ग, आपला बेंच, आपले शिक्षक, त्यांचे शिकविणे, त्यांनी केलेली शिक्षा, त्यांना आपण दिलेला त्रास अशा एक ना अनेक आठवणींना उजाळा मिळाला. सर्व जण वेळात वेळ काढून फक्त अर्धा तासासाठी येऊ अशा अटींवर आलेले म्हणता म्हणता २ ते ३ तास उलटून गेले तरी शाळेतून पाय काढावसा वाटत नव्हता.



आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षांनंतर आपण एकत्र भेटत आहोत. त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावनाही होतीच; पण एकत्र आले आणि सर्वांनीच गळाभेट घेतली. 



परीक्षा दिल्यानंतर बहुतांशी मित्र, मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले. करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं. पण व्हॉटसअॅप आणि फेसबुकने आमच्या मैत्रीचा पुर्नजन्म घडवला.


सुरुवातीला आपले जुने शिक्षक वय वर्ष ८२ असलेले सी. व्ही. चौधरी सर, प्राचार्य सी. सी. सपकाळे सर, पर्यवेक्षक जे. वी. तायडे यांचा शाल, श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे यांचा आणि तब्बल ३८ वर्ष सेवा देऊन महिना अखेरीस सेवानिवृत्त होणारे शाळेचे कर्तव्यदक्ष शिपाई दिलीप काळे यांचा देखील सत्कार करण्यात आला आणि आठवण म्हणून शाळेला भारतमातेची प्रतिमा सप्रेम भेट दिली गेली.



शेवटी सेवानिवृत्त शिक्षक सी. व्ही. चौधरी, प्रा. सी. सी. सपकाळे, पर्यवेक्षक जे. वी. तायडे यांनी आणि माजी विद्यार्थ्यांमधून नीलिमा बागुल अहिरराव हिने आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेमुळे आम्ही आज आमच्या जीवनात यशस्वी झालो त्यामुळे शाळेसाठी आम्ही काहीतरी करू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली. 



कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीता कासार, मिलिंद भारंबे, मुरली चौधरी, चारुदत्त वानखेडे, विजू बेंडाळे, विकास भंगाळे, प्रतिभा भंगाळे, प्रदीप कुलकर्णी यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सचिन सकळकळे यांनी केले.


या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم