प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता १२ वी च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवार ता. २१ रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला. सावदा शहरातील नगरपालिका संचालित श्री आ.गं.हायस्कुल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल लागला असून निकाल खालील प्रमाणे -
१२ वी विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक -- महाजन दुर्वा सुनील एकूण गुण ५३० (८८.३३%)
द्वितीय क्रमांक -- भारंबे भावेश महेश एकूण गुण ५०२ (८३.६७%)
१२ वी कला शाखा
प्रथम क्रमांक -- पाटील हर्षदा नरेश एकूण गुण ४४० (७३.३३%)
द्वितीय क्रमांक -- फकीर यास्मिनबी सिकंदर शाह एकूण गुण ४१५ (६९.१७%)
१२ वी विज्ञान शाखेत एकूण १२८ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी १२७ उत्तीर्ण झालेले आहेत व
१२ वी कला शाखेत एकूण १०५ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी ८१ उत्तीर्ण झालेले आहेत.
दोन्ही मिळून एकूण २३३ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी २०८ उत्तीर्ण झालेले आहेत.
शाळेचा एकूण निकाल हा ८९.२७% लागलेला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी गटनेते, माजी नगरसेवक, मुख्याधिकारी भूषण वर्मा, मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे, पर्यवेक्षक जे. व्हि. तायडे, व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनींचे
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
إرسال تعليق