फैजपूर प्रतिनिधी : राजू तडवी
माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्या निवासस्थानी दिनांक 23 मे रोजी संध्याकाळी शहरातील आदिवासी तडवी बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरची बैठक पांडुरंग सराफ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सदर बैठकीला हिरालाल चौधरी, पंडित कोल्हे, माजी मुख्याध्यापक रामदास बैरागी, पत्रकार सलीम पिंजारी, पत्रकार राजू तडवी समाज बांधवांची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये कै. यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पंडित दीनदयाल उपाध्याय मुला मुलींची अनुदानित आश्रम शाळा पिंपरूड ता. यावल या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे.
सदरची शाळा पहिली ते बारावी पर्यंत आदिवासी मुला-मुलींना मोफत प्रवेश देणार आहे. सदरची शाळा ही निवासी असून मुलांची राहण्याची, कपडे, पुस्तके सर्व मोफत दिले जाणार आहे.
इयत्ता पहिली ते बारावीचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ही माहिती देण्यासाठी शहरातील तडवी आदिवासी बांधवांची बैठकीचे आयोजन केले होते. उपस्थित समाज बांधवांना माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी सदरची शाळा ही अनुदानित असून सर्व खर्च शासन करणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह त्यांच्यातील असणाऱ्या कलागुणांना सुद्धा वाव देण्यात येईल व चांगल्या क्रीडा शिक्षकाची ही नेमणूक करण्यात येईल. आदिवासी बांधव हा समाजात पुढे गेला पाहिजे तो शिक्षित झाला पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही अनुदानित मुला मुलींची शाळा सुरू करीत आहोत त्याचा रावेर-यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
إرسال تعليق