प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे म्हणून सावदा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सावदा शहरात वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून आज रोजी भारतीय निवडणूक आयोगाचे एकी मॅसस्कॉट द्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.
एकी मॅसस्कॉट द्वारे बस स्टँड परिसर, मार्केट परिसर, शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे मतदान जनजागृती व माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिक व मतदार यांनी ‘एकी मॅसस्कॉट’ सोबत सेल्फी घेऊन मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘एकी मॅसस्कॉट’ ला बघण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी गर्दी करत असून "एकी" हे बालगोपाळांच्या आकर्षणाचे केंद्र बनले. तसेच मॅसस्कॉट द्वारे मा. जिल्हाधिकारी सो. यांचे आवाहन पत्र देण्यात आले.
यावेळी अविनाश पाटील, अरुणा चौधरी, कार्तिक ढाके, हमीद तडवी, विनय खक्के, संदीप पाटील, महेश इंगळे, मनोज चौधरी, अमित तडवी, मुकादम व सर्व शिपाई वर्ग, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
إرسال تعليق