Khandesh Darpan 24x7

वाहनात ध्वनीक्षेपक लावून गल्लोगल्ली विक्री :व्यवसायाचा ट्रेंड बदलला ; खापरावरची पुरणपोळी आता घरासमोरच तयार करून मिळते 20 मिनिटांत


प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


जळगाव तरुणाईत क्रेझ असलेला पिझ्झा मागणी नोंदवल्यावर ३० मिनिटांत घरपोहोच न आल्यास पैसे परत असे व्यावसायिक गुणवत्तेचे गणित सांगितले जाते. मात्र, त्याला मागे टाकून अस्सल खान्देशी मेनू म्हणून ओळख असणारी खापरावरची पुरणपोळी अवघ्या २० मिनिटांत घरासमोर तयार करून खवय्यांना उपलब्ध होत आहे.


हा मेनू ग्रामीण भागात अक्षय्य तृतीया, पोळा, कुलदेवतेची आरती इत्यादी प्रसंगी होतो. परंतु, त्यात आता बदल झाला आहे. पुरणपोळीची मागणी शहरातही वाढू लागली आहे. पुरणपोळ्या बनवताना महिला. हॉटेल व रेस्टॉरंटचे जेवण, स्पेशल डीश वेगवेगळ्या पुरवठा करणाऱ्या साखळी चेनतर्फे घरपोहोच पोहचवण्याची व्यवस्था गेल्या काही वर्षात प्रचलित झाली आहे.


तशीच खापराची पुरणपोळी थेट घरपोहोच मिळू लागली आहे. त्यातून अनेकांना रोजगार मिळण्यास मदत होते. पुरणपोळी बनवण्यासाठी किमान चार तास आधी तयारी करावी लागते. चना डाळ व गुळ समप्रमाणात घेऊन त्याचे सारण करावे लागते. खापराच्या पोळीसाठी खास लोकवन गहू वापरला जातो. त्यातही तीन प्रकार असतात. त्यातील लांब दाण्याच्या गव्हाला जास्त वाक असतो. त्यात चनाडाळ व गुळाचे सारण भरून ती अगोदर सामान्य पोळीप्रमाणे लाटून नंतर हातावर लांबवून खापरावर टाकली जाते. या प्रक्रियेला किमान २० मिनिटे लागतात असे शोभाबाई धनगर यांनी सांगितले.


येथे मिळते पुरणपोळी : जळगाव शहरात बहिणाबाई उद्यान, महाबळ कॉलनी रस्त्यावरील हतनूर हॉल, प्रभात चौक, दादावाडी चौक, गणेश कॉलनी रस्त्यावरील ख्वॉजामिया दर्ग्याजवळ व नूतन मराठा कॉलेजजवळ खापरावरील गरमागरम पुरणपोळी मिळते.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/bhusawal/news/street-selling-with-loudspeakers-in-vehicles-133228939.html?_branch_match_id=1276923822377862286&utm_campaign=133228939&utm_medium=sharing&_branch_referrer=H4sIAAAAAAAAA8soKSkottLXz8nMy9ZLySyrTMxNLEosycjUS87P1Y8odzEyTA1y8vJOAgC4%2FcU0KQAAAA%3D%3D

या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 
सहप्रायोजक आहे.

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

أحدث أقدم