Khandesh Darpan 24x7

सावदा येथे ख्वाजा नगर भागात वीज चोरी शोध मोहीम - आठ ग्राहकांचे वीज मीटर जप्त




 

सावदा ख्वाजा नगर परिसरात वीज चोरी शोध मोहीम


शहरातील ख्वाजा नगर भागामध्ये आज दि. १२ रोजी अचानक  वीज चोरी शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी वीज बिल कमी आलेल्या ग्राहकांचे वीजमीटर तपासून जे ग्राहक वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करताना आढळुन आले अशा जवळपास ७ ते ८ ग्राहकांवर वीजचोरी पथकाने कारवाई केली असून सदरील सर्व ग्राहकांचे मीटर महावितरण कंपनी कडे जमा करण्यात आले आहे. 


वीज चोरी मोहीम पथकामध्ये  महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सहाय्यक अभियंता हेमंत चौधरी, मंगेश यादव, विशाल किनगे, योगेश चौधरी, प्रधान तंत्रज्ञ राजु कचरे, वरिष्ठ तंत्रज्ञ भूषण बेंडाळे, गिरीश कापडे, प्रविण साळी, तंत्रज्ञ विशाल नेमाडे, तेजस जाधव सहभागी झाले होते. या सहभागी पथकाने शेडछाड केलेल्या वीज मीटर ग्राहकांचे मीटर जप्त करून कार्यवाही केली.



महावितरण सावदा विभागातर्फे सर्व सावदा शहरातील ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, वीजचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी कोणीही वीजचोरी करू त्यामुळे वारंवार डीपी जळणे, तार तुटणे, फेज, डिओ जाणे असे प्रकार घडतात. तरी वीज मीटर ग्राहकांनी वीज चोरी करून आपल्या विरुद्ध होणाऱ्या फौजदारी कारवाईला टाळा आणि स्वच्छ मनाने विजेचा वापर करा. आणि महावितरण ला सहकार्य करा. असेही आवाहन अभियंत्यांनी यावेळी नागरिकांना केले.


या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.


आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم