प्रतिनिधी : गाते
यश सिध्दी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य जि. जळगाव च्या पुढाकाराने २५ वा कारगिल विजय दिवस सावदा रेल्वे स्टेशन मधे साजरा करण्यात आला, अध्यक्ष स्थानी १९७१ चे रिटायर्ड युध्दविर सुभेदार मेजर सुरेश तेलांग हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर नगरचे आ. चंद्रकांत पाटील, सावदा पोलीस स्टेशन चे ए पी आय विशाल पाटील होते.
सर्व प्रथम शहीद सैनिक स्मारकास रिथलिंग परेड च्या माध्यमातून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व यश सिध्दी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी व सैनिकांनी सैनिकी शिस्तबद्ध पद्धतीत मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक अशोक दामोदर यांनी केले. प्रस्ताविक यश सिध्दी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे महा सचिव कैलास खिल्लारेनी केले. प्रस्ताविक मधुन त्यांनी कारगिल युद्ध हे ३ मे १९९९ ला सुरुवात होउन २६ मे ऑपरेशन विजय पैदल सेना, ऑपरेशन सफेद चादर वायु सेना व ऑपरेशन तलवार नौदल सेना यांचे संयुक्तरित्या राबवुन २६ जुलैला विजय मिळवून दिला. कारगिल युद्ध हे पाकिस्तानी सैनिकांमार्फत भारतीय LOC मधील १४० युद्ध बंकर मधे नापाक घुसपैठ केली. ४००० - ५००० फुट उंच पहाडीवर मायनस डिग्री सेटिंग्रेड तापमानात आपल्या जिवाची पर्वा न करता चढुन जाउन निकाराचा लढा भारतीय सैनिकांनी दिला व कारगिल क्षेत्रात घुसलेल्या पाकिस्तान सैनिक व अंतकवाद्यांना खतम करुन १४० युद्ध बंकर वर ताबा मिळवून ऑपरेशन विजय यशस्वी केले. कैलास खिल्लारेनी त्यांच्या भाषणातून कारगिल युद्धाचा मास्टर माईंड परवेज मुशर्रफ होता, त्याने कारगिल युद्धाचा प्लान कसा आखला व त्याला यशस्वी करण्याचा कसा प्रयत्न केला तसेच भारतीय सैनिकांनी कसा निकाराचा लढा दिला हे सविस्तर सांगितले.
कारगिल विजय दिवस कार्यक्रमात विरनारी, विर माता पिता व शहीद परिवाराचा सत्कार करण्यात आला. आ. चंद्रकांत पाटील व ठाणेदार विशाल पाटील यांनी कारगिल विजय दिवसानिमीत्त आपले विचार व्यक्त केले, सदर कार्यक्रमास यश सिध्दी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे सर्व पदाधिकारी व सैनिक तथा नागरिक उपस्थित होते.
महासचिव कैलास खिल्लारे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुभेदार भारत तायडे, नाशिक उपाध्यक्ष संजय बाविस्कर, नवल धुरंधर, सुधाकर तायडे, प्रभाकर तायडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजु वानखेडे, प्रकाश मिसाळकर, सुभेदार अशोक पवार, सुभेदार क्रिष्णा खराटे, शेषराव म्हस्के, अशोक दामोदर, हिलोडे, जगन्नाथ कळसकर, भिमराव कळसकर, माजी पोलीस विलास झांबरे, रामु मेढे, राहुल तायडे, सावदा रेल्वे स्टेशन मास्तर तिवारी, संरपंच सारीका पाटील, माजी सरपंच, पोलीस कर्मचारी तसेच यश सिध्दी बहुउद्देशीय महीला मंडळ व नागरीक उपस्थित होते. आभार प्रदर्शन संजय बाविस्कर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभेदार भारत तायडे, संजय बाविस्कर व सर्व जळगाव टिम ने अथक प्रयत्न केले.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
إرسال تعليق