प्रतिनिधी | सावदा
बऱ्हाणपूर अंकलेश्वर
महामार्गावर खड्ड्यांमुळे चाळणी झाली असून प्रकल्प अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून अभियंता
चंदन गायकवाड यांनी मागील उपोषणावेळी लेखी आश्वासन दिल्यानंतरही नऊ महिन्यानंतर
काम पूर्ववत सुरू झाले नसल्याने येथील पत्रकार संघटना व विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, राजकीय प्रतिनिधी फैजपूर ते चोरवड रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे यासाठी पुन्हा
जाफर लोन समोर 'रास्ता रोको' सुरू आंदोलन सुरु केले. आंदोलन
तब्बल सात ते आठ तास चालले.
राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार जोपर्यंत आंदोलन स्थळी भेट देऊन
काम मार्गी लावणार नाही तोपर्यंत आंदोलन मिटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी
घेतल्याने शिवाजी पवार व मक्तेदार यांना आंदोलन स्थळी यावे लागले. पवार आंदोलन
स्थळी आल्यानंतरही "रस्त्याचे काम तात्काळ सुरू होईल तेंव्हाच आंदोलन मागे घेतले
जाईल" त्यामुळे प्रकल्प संचालक यांची चांगलीच गोची झाली.
सावदा येथील ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशन पत्रकार संघटना व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून हे आंदोलन पुकारण्यात आले. सकाळी सात वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आले. यानंतर अनेक राजकीय पदाधिकारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
या आंदोलनाला इतर विविध पत्रकार संघटनांनी पाठींबा
दर्शविला. यावेळी "नाकर्त्या प्रशासनाचा जाहीर धिक्कार असो", "बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग
मार्गी लागलाच पाहिजे" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
प्रसंगी रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी, वंचित बहुजन पक्षाच्या
जिल्हाध्यक्षा शमीभा पाटील, युवा नेतृत्व धनंजय चौधरी, कोचूर येथील शेतकरी संजय पाटील, सावदा शहराचे माजी उपनगराध्यक्ष
दत्तात्रय महाजन, सय्यद अजगर, पंकज येवले, फिरोज खान पठाण, सुधाकर पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, कुशल जावळे, सुनील नारखेडे, फैजपूर येथील नगरसेवक कलीम
मेंबर, भरत लीदुरे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनाला जाहीर
पाठिंबा दिला, तर रोहिणी खडसे, श्रीराम पाटील, सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष
राजेश वानखेडे, अनिल चौधरी यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलकांशी चर्चा करून
आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.
शिवाजी
पवार यांना विचारला जाब
आंदोलन
स्थळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी भेट दिली
तेव्हा आंदोलन कमालीचे आक्रमक होऊन त्यांना जाब विचारत सदर रस्त्यावर किती रुपयाची
तरतूद आहे? किती बिले काढण्यात आली आहे? व रस्ता कधीपर्यंत पूर्ण होणार
आहे? या प्रश्नांच्या सरबतीमुळे शिवाजी पवार हे अनुत्तर झाले.
८०
कोटीच्या रस्त्यावर ३० कोटी बिल अदा
बऱ्हाणपूर
अंकलेश्वर महामार्ग गुजरात सीमेपासून तळोदा येथून ते मध्यप्रदेश सीमेपर्यंत चोरवड
गावाजवळ तब्बल ८० कोटी रुपये मंजूर असून यात खड्डे बुजणे व ठिकाणी प्लास्टर
मारणे आहे. यात आतापर्यंत ३० कोटी रुपये मक्तेदाराला बिले अदा करण्यात आली आहे.
कामाची
डेडलाईन संपली तरी नवीन डेडलाईन
जुलै
२०२४ ही कामाची अंतिम दिनांक असल्याने तिथपर्यंत काम करणे मक्तेदाराला बंधनकारक
होते, तरी देखील मक्तेदाराने काम पूर्ण न केल्याने आंदोलन
उभारण्यात आले. आता प्रशासनाने डिसेंबर २०२४ अशी नवीन डेडलाईन मक्तेदाराला दिली
आहे.
प्रकल्प
संचालक व मक्तेदाराचे लेखी आश्वासन
सावदा
येथील रावेर रोडवर आंदोलनाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली, यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी
आंदोलन स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.
प्रकल्प अधिकारी शिवाजी पवार व तहसीलदार बंडू कापसे यांच्या
उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासमोर ठेकेदार यांनी प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर व हे काम पूर्ण दीड महिन्यात
करू असे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको दुपारी तीन वाजता सुरळीत वाहतुकीस खुला
करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार
व तहसीलदार बंडू कापसे यांच्या उपस्थितीत सहाय्यक
पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासमोर मक्तेदार श्रीराज भांबरे यांनी लेखी आश्वासन देत दोन दिवसात
सावदा व पंधरा दिवसात चोरवड पर्यंत रस्त्याचे काम मार्गी लावू असे लेखी आश्वासन
दिले आहे.
आणि कामाला सुरुवात...
जोपर्यंत काम
होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे होत नाही हा पवित्रा घेतल्याने प्रशासनाला
आंदोलकांसमोर नमते घेत सावदा फैजपूर मधील साईबाबा मंदिराजवळ गटारी व खडीकरणासह
डांबरीकरणाचे काम सुरू करावे लागले तेव्हा आंदोलनकर्त्यांनी दुपारी अडीच वाजता
आंदोलन मागे घेतले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक
विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप,
यांच्यासह स्थानिक पोलीस प्रशासन,
गृहरक्षक दल यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
वाहतूक
इतरत्र मार्गाने वळवली
सावदा
रावेर महामार्ग येथे आंदोलनकर्त्यांचे आंदोलन सुरू असल्याने रावेर कडे जाणारी
वाहतूक मस्कावद मार्गे तर फैजपुर कडे जाणारी वाहतूक चिनावल मार्गे वळवण्यात
आली होती यावेळी अवजड वाहनांच्या रांगाच्या रांगा महामार्गांवर
दिसून येत होत्या.
या बातमीचे प्रायोजक आहे.
إرسال تعليق