प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील गणित विभागाची विद्यार्थिनी कु. योगिता नितीन वाघ हिला मराठी-विज्ञान परिषदेमार्फत पदव्युत्तर वर्गासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
मूलभूत विज्ञानात विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेने ही शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे. सदर शिष्यवृत्ती ही दोन वर्षासाठी (२०२४-२६) असून प्रत्येक वर्षी तिला रुपये दहा हजार मिळणार आहेत.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी एम.एस.सी च्या प्रत्येक वर्षात एकूण ६० तास मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान प्रसाराच्या कार्यासाठी देणे आवश्यक आहे, त्यामध्ये कार्यशाळा, माध्यम विज्ञान प्रसार व विज्ञान लेखन यापैकी कुठल्याही प्रकारांमध्ये सदर विद्यार्थ्याने सहभाग नोंदवावा हे अपेक्षित आहे.
शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल सदर विद्यार्थिनीचे तापी परिसर विद्या मंडळ मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी, सर्व नियामक मंडळ सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. बी.वाघुळदे, सर्व उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
إرسال تعليق