Khandesh Darpan 24x7

श्री काळभैरव जयंती निमित्त रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथे श्री काळभैरव मुकुट शोभायात्रेचे आयोजन

 


प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


थोरगव्हाण ता. रावेर येथे काळभैरव जयंती निमित्त उत्सव हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे. मानाचे श्रीकाळभैरव मंदिर प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून झेंडूच्या फुलांच्या माळांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सजविण्यात येते. 



पहाटे श्री काळभैरव मुकुट गावचे पोलीस पाटील अरविंद झोपे यांचे समक्ष श्री काळभैरव उत्सव समिती सदस्य सचिन  भिल, हर्षल पाटील, राजू कोळी, विजय बाऊस्कर यांचे सहकार्याने विधिवत अलंकारांनी सजविण्यात येते. 





सकाळी १० वाजेला श्री काळभैरव मुकुटाची शोभायात्रा गावातील १२ बलुतेदार यांच्या उपस्थितीत आणि सहकार्याने ग्रामपंचायत पासून पारंपारिक वाद्य डफ, ढोल- ताशेच्या निनादात गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात येवून मुकुट मंदिरातील बाण्यावर दुपारी १२ वाजेला चढविण्यात येते. यावेळी हजारोच्या संखेने भाविक भक्त परिसरातून त्याचप्रमाणे महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्यातून दर्शनासाठी तसेच मानलेला मान पूर्ण करण्यासाठी येत असतात. 


प्रसंगी गावचे पुरोहित वैभव पुराणिक यांनी विधिवत पूजन करून गावचे पोलीस पाटील अरविंद झोपे यांचे हस्ते आरती करून आलेल्या भाविकांना दर्शनाचा लाभ मिळतो. दुपारी १ वाजेला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्यावतीने भैरवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात येते. श्री कालभैरव मंदिराजवळ अनेक भक्त मनातील इच्छापूर्तीसाठी मान देतात. वजनाच्याबरोबर गुळ, गोड चुर्मा, पेढा आदीचा चढवा श्रीकालभैरव चरणी चढवितात. तसेच बाजरी आणि कळण्याची भाकरी वांग्याचे भरीत संख्येनुसार प्रसाद म्हणून अर्पण करतात. संध्याकाळी बाहेरून आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो. अश्या पद्धतीने श्री काळभैरव जयंती मोठया उत्साहाने साजरी केली जाते. 



या बातमीचे प्रायोजक आहे.

जाहिरात


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.






Post a Comment

أحدث أقدم